fraud1 
पुणे

व्यवस्थापकाकडूनच बॅंकेला तीन कोटींचा गंडा

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या व्यवस्थापकाने बोगस कागदपत्रे व बोगस कर्जदार दाखवून बॅंकेला तब्बल तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदर्शन बाळासाहेब बाबर (रा. उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर) असे या बॅंक व्यवस्थापकाचे नाव आहे. 

याबाबत लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी माहिती दिली की, बाबर हे 23 जून 2016 ते 17 मे 2019 या दरम्यान महाराष्ट्र बॅंकेच्या कुंजीरवाडी (ता. हवेली) शाखेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. 17 मे रोजी त्यांची इंदापूरला बदली झाली. तेथे त्यांनी 20 मे रोजी पदभार स्वीकारला. याच दरम्यान बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाला त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय आला.

बॅंकेच्या अधिकाऱ्यामार्फत कुंजीरवाडी शाखेत त्यांच्या काळातील व्यवहाराची गोपनीय चौकशी केली. त्यात त्यांनी 29 कर्ज प्रकरणात एक कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज कोणत्याही कागदपत्रांशिवाय बोगस कर्जदारांना दिल्याचे निष्पन्न झाले. तसेच, इंदापूर शाखेत हजर झाल्यानंतरही त्यांनी कुंजीरवाडी शाखेचा गोपनीय कोड वापरून 65 लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची बाब लक्षात आली. तसेच, इंदापूर शाखेत त्यांनी 27 मे ते 3 जून या केवळ सहा दिवसांत एक कोटी 60 लाख रुपयांची बोगस कर्ज प्रकरणे केल्याची बाब उघडकीस आली.

बॅंकेच्या वरिष्ठ अधिकारी उज्ज्वला दासराव साकळकर (वय 57, रा. शिवणे, ता. हवेली) यांनी बाबर यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT