hadash 
पुणे

मुळशी तालुक्यातील या 17 गावांची चिंता मिटली  

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी पुरवठा करणारे हाडशी क्र. १, हाडशी क्र. २ आणि वाळेण येथील बंधारे मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यातील सतरा गावांचे वर्षभरासाठी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या तीन बंधाऱ्यांतील पाणी वळकी नदीमध्ये सोडण्यात येते. हे आवर्तन 21 दिवसांनी सोडण्यात येते. त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या विहिरींचीही पाणीपातळी वाढते. या विहिरींतील पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. सुरुवातीला निसर्ग वादळामुळे व त्यानंतर दोन- तीन वेळा पडलेल्या जोरदार वळवाच्या पावसाने बंधाऱ्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने बंधारे पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. तसेच, पावसाअभावी रखडलेली भात लागवडीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT