Ganpati 
पुणे

ऑस्ट्रेलियातील या भागात आहेत तीन गणेशमंडळे

नीला शर्मा

ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात चक्क तीन गणेश मंडळे आहेत. येथे अठराशेच्या जवळपास मराठी कुटुंबं आहेत. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. सगळ्यांचा मिळून पूर्वी एका ठिकाणी गणेशोत्सव साजरा करायचे, मात्र निवासस्थानांची अंतरं जास्त असल्याने हळूहळू तीन ठिकाणी गणेशमंडळं आकाराला आली. तिन्ही मंडळांत उत्सवाचं मंगलमय वातावरण सध्या भक्त अनुभवत आहेत. अतुला काळे यांनी ही माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मूळच्या पुण्याच्या अतुलाताई म्हणाल्या, ‘‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथली मराठी माणसं परस्परांना भेटतात. गप्पांमधून मायभूमीच्या आठवणींना उजाळा देतात. जुनी पिढी नव्या पिढीला गणेशोत्सवामागची लोकमान्य टिळकांची भूमिका सांगते. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये श्री मंदिर, ऑबर्न येथे अकरा दिवसांचा गणेशोत्सव सुरू करण्यात आला. या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत गेल्यावर जागा कमी पडू लागली. मग अठरा वर्षांपूर्वी मिटो शिवमंदिरात गणेशोत्सव साजरा होऊ लागला. यासाठी कार्यरत मंडळाचं नाव आहे ‘मराठी कट्टा.’ सिडनीच्या पश्‍चिम भागात आठ वर्षांपासून आणखी एका मंडळाचा उत्सव सुरू झाला.’’

अतुलाताईंनी असंही सांगितलं की, तिन्ही मंडळांकडून गाणी, नाटक आदी प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. खास त्यासाठी एखादं सभागृह घेतात. त्यांत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेजण सहभागी होतात. सभागृह तसंच मंचाची सजावट आणि रोषणाई अगदी दिमाखदार असते. तिन्ही मंडळांमध्ये साधारण दोन ते तीन हजार माणसं महाप्रसादाचं भोजन करतात. अनेक महिला यासाठी गटागटाने निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. घरगुतीपणाच्या स्पर्शाने हा स्वयंपाक अधिकच चवदार लागतो, अशी दाद तेथील नागरिकांकडूनही मिळते. एक प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात येते. ती तीन तास चालली तरी ढोल-ताशांच्या तालावर नाचणाऱ्यांचा उत्साह काही कमी होत नाही. यात वयोवृद्धांची पावलंही थिरकत असतात.

तीस ढोल व पंधरा ताशे असलेल्या शिवगर्जना पथकात सामील स्त्री-पुरुष कार्यकर्ते दोन महिने अगोदरपासून कसून सराव करतात. अकरा दिवसांच्या या उत्सवात गणेशमूर्तीचं विसर्जन, पर्यावरणाला बाधा पोहोचू नये म्हणून हौदात केलं जातं.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT