Three killed in nature cyclone in pune district 
पुणे

निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू अन्...

सकाळवृत्तसेवा

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिघांचा बळी गेला असून, अन्य तिघे जखमी झाले आहेत. तसेच, दीड हजार घरांचे आणि चारशे हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
प्रकाश किसन मोकर (वय 52 , रा.मोकरवाडी, ता.हवेली) यांचा लोखंडी पत्रा लागून मृत्यू झाला आहे. तर, मंजाबाई अनंत नवले (वय 65, वहागाव, ता.खेड) आणि नारायण नवले (वय 47, रा.वहागाव, ता.खेड) या दोघांचा मृत्यू भिंत कोसळून मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत व्यक्तींच्या वारसांना प्रति व्यक्ती चार लाख रुपये मदत देण्यात येईल. याबाबत हवेली आणि खेड तहसिलदार यांच्यामार्फत कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी वेब पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरीतील महापालिका सर्वसाधारण सभेत झाली खडाजंगी; कोण काय म्हणाले वाचा सविस्तर

पुणे विभागात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे. परंतु सर्वाधिक नुकसान पुणे जिल्ह्यात झाले आहे. त्यात सुमारे दीड हजार घरांचे अंशत नुकसान झाले आहे. याशिवाय 114 पक्की घरे, अंगणवाडी, शाळा आणि 89 झोपड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव यासह अन्य तालुक्यांतील 402 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसांत या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT