baby1.jpg
baby1.jpg 
पुणे

पुणे : तीन महिन्याच्या बाळाने जिंकली कोरोना विरूध्दची लढाई 

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट भागातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात तीन महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे इतर रुग्णांना ही आनंदाची व दिलासा देणारी बातमी ठरली आहे . हे बाळ गेल्या काही दिवसांपासून पटेल रुग्णालयात उपचार घेत होते.

यावेळी बाळाची आई मात्र निगेटिव्ह होती. अशा वेळी बाळाला आईपासून वेगळे ठेवून त्यावर उपचार करणे हे डॉक्टरांना कठीण झाले होते. अशा प्रसंगी डॉक्टरांनी केलेल्या योग्य पद्धतीच्या उपचारांमुळे हे शक्य झाले.

गेल्या तीन महिन्यांपासून आतापर्यंत 100 कोरोनाग्रस्त रुग्ण हे या रुग्णालयातून उपचार घेऊन बरे झाले आहे. आज बाळासह एका रुग्णाला ही घरी सोडण्यात आले. सध्या 200 संशयित रुग्ण हे क्वारंटाइन असून 97 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे-क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT