jail.jpg 
पुणे

बांधकाम व्यावसायिक खंडणी प्रकरणात मदत केल्याप्रकरणी आणखी तिघांना अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडे दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्‍हाटे यास पळून जाण्यास मदत केल्यामुळे कोथरूड पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांना 29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

विशाल शिवाजी ढोरे (वय 36), अस्लम मंजूर पठाण (वय 24, दोघेही रा. मांजरी, हडपसर) व सिद्धार्थ महिंद्र डांगी (वय 28, रा. उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. या गुन्ह्यात शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र  जैन, दिप्ती आहेर यांना जामीन मंजूर झाला आहे. तर रविंद्र बर्‍हाटे, अमोल चव्हाण या दोघाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी (64, रा. राजगड, शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्हयाचा कोथरुड पोलिसांकडुन तपास केला जात असतानाच बर्‍हाटे व चव्हाण या दोघाच्या मागावर पोलिस होते. दरम्यान, बर्‍हाटे याला पळून जाण्यासाठी ढोरे, पठाण व डांगी या तिघानी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनीच बर्‍हाटेला नवीन  सिमकार्ड खरेदी करून दिले. तसेच अटक केलेले तिघेजण व 
बर्‍हाटे असे चौघेजण 8 जुलै रोजी लक्ष्मी कॉलनी परिसरात भेटले होते. तेथून ते बर्‍हाटेला घेऊन सोलापूर गेले. तेथे त्यांनी अमोल नागरसे या व्यक्तीच्या घरात बर्‍हाटेला ठेवले. अटक केलेल्या या तिघांना बर्‍हाटे नेमका कुठे आहे, याविषयी माहिती आहे.  त्यास पनवेल, लोणावळा व सोलापूर या ठिकाणी लपविल्याचेही त्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडुन या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही जप्त करायच्या  असल्याने सरकारी वकीलांनी त्यांना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare Reaction : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, सरकारला दिला 'हा' सल्ला

Sangli Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! सांगलीत कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात ३७,८६५ जण पात्र; जिल्हा बँकेचे ३४ हजार पात्र

Kargil Vijay Diwas 2026: युद्धाच्या रणधुमाळीत धाडसाचा इतिहास रचणाऱ्या महिला अधिकारी; जाणून घ्या कारगिलच्या रणरागिणींविषयी..

Latest Marathi News Update : तेजप्रताप यादव यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी, कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल

Thane News: मुंब्र्यात डोंगराचा भाग खचला, धोकादायक परिस्थिती निर्माण; ९ कुटुंबांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT