corona  
पुणे

मुळशी तालुक्यात असा सुरू आहे कोरोनाचा प्रवास  

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मुलगा आणि मुलीचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, तालुक्यातील आंबवणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचाऱ्याचाही रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. 

भूगाव येथील 55 वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्यक्तीला कोरोनाबाधित भावाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी, मुलगा व मुलगी या तीन जणांना प्रशासनाने तातडीने क्वारंटाइन केले होते. त्यांच्याही कोरोनाबाबतच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात या व्यक्तीचा मुलाचा व मुलीचा कोरोनाबाबतचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

वडिलांसह मुलगा-मुलगी कोरोनाबाधित झाल्याने मुळशीकरांना प्रशासनाने अधिक सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित कोरोना पाँझिटिव्ह व्यक्ती शिळेश्वर गावात शेतीच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी गेली होती.  

तसेच, मावळ तालुक्यात राहणाऱ्या व मुळशी तालुक्यातील आंबवणे प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, सदर कर्मचारी मागील दहा दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले नाहीत, ते रजेवर होते. त्यामुळे आंबवणे येथील ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. मात्र, मास्क वापरावा व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभाग, पोलिस आणि तहसील प्रशासनच्या वतीने करण्यात आले असून, तालुका कोरोनामुक्त राहावा, यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT