Three people died in an accident two two-wheelers collided head-on in Ashtapur Phata marathi News  
पुणे

Pune Accident : अष्टापुर फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; बाप लेकासह तीघांचा मृत्यू

दोन दुचाकीच्या समोरा समोरील धडकेत तीन जण मृत्युमुखी पडल्याची गंभीर घटना अष्टापुर फाटा येथे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : दोन दुचाकीच्या समोरा समोरील धडकेत तीन जण मृत्युमुखी पडल्याची गंभीर घटना अष्टापुर फाटा येथे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सहा वर्षीय मुलासह त्याच्या वडीलांचा समावेश आहे. प्रवीण सुनील पाटोळे (वय २८ वर्ष) व त्यांचा मुलगा राजवीर (वय ०६ वर्ष, दोघे रा. अष्टापुर तालुका हवेली), व यश शेखावत (वय २१ वर्ष, रा न्हावी फाटा, शिंदे पोल्ट्री फार्म जवळ, ता हवेली ) हे तिघे जण मृत्युमुखी पडले.

या प्रकरणी अक्षय अनिल पाटोळे (वय २९ वर्षे, रा-आष्टापुर ता. हवेली जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली. लोणी कंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटोळे हे मुलासह दुचाकीवर अष्टापुर फाटा येथे दूध घालून घरी जात होते. यावेळी समोरून यश हा अती वेगात दुचाकीवरून येत होता. अष्टपुर फाटा येते दोन दुचाकींची समोरा समोर धडक झाली. यामध्ये प्रवीण हे जागीच मृत्यूमुखी पडले तर राजवीर हा उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडला. तर दुसरा दुचाकी धारक यश हा पुण्यात उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडला. या प्रकरणी यश याच्यावर हयगयीने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने अष्टापुर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT