police.jpg 
पुणे

पत्नी व बहिणीसह आयकर अधिकारीच अडकला...कोठे ते वाचा

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : वाट चुकल्याने रामदरा परिसरातील खोल दरीमध्ये अडकलेल्या केंद्रीय आयकर विभागाच्या निरीक्षकासह त्यांची पत्नी व बहिण अशा तिघांची लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता. 22) मध्यरात्री दीडच्या सुमारास सुखरूप सुटका केली. पोलिसांनी यासाठी सहा तासाहून अधिक काळ अथक परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. 

शंशाक सुभाष बिस्नोई (वय 30, रा. कॅंप, मूळगाव रा. राजस्थान), त्यांची पत्नी अलविना (वय 25) व शंशाक यांची बहीण टिना (वय 22) अशी पोलिसांनी सुटका केलेल्या तिघांची नावे आहेत. शंशाक हे केंद्रीय आयकर विभागाच्या पुणे कार्यालयात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ते पत्नी अलविना व बहीण टिना यांच्यासह रामदरा परिसरात शनिवारी दुपारी फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते आळंदी म्हातोबाची गावच्या बाजूच्या सुमारे सातशे मीटर खोल दरीत उतरले. त्यानंतर ते रस्ता चुकले. 

अंधार पडल्याने रस्ता दिसत नसल्याने तिघांची भीतीने गाळण उडाली. त्या परिस्थितीत शशांक यांनी गुगलवरुन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा फोन नंबर शोधून पोलिसांना आपण दरीत रस्ता चुकल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सातच्या सुमारास रामदरा डोंगराच्या परिसरात धाव घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर त्यांनी शशांक यांना फोन करून तुम्ही नेमके कुठे आहात, अशी विचारणा केली. मात्र, शशांक यांना नेमके ठिकाण सांगता आले नाही. त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेऊन त्यानंतर खोचे व ननवरे यांनी दरीत उतरण्यास सुरुवात केली. किर्र अंधार, दाट झाडी आणि निसरडा रस्ता यातूनही मार्ग काढत अखेर पाच तासांनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास खोचे व ननवरे हे शशांक यांच्या जवळ पोचले. त्यानंतर त्यांना दीडच्या सुमारास दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार, तरी पाण्याची चिंता कायम! ७ धरणांच्या साठ्यात फक्त ३ टक्के वाढ, आकडेवारी समोर

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Marathi Live Updates : पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी झेप; अवघ्या एका दिवसात तब्बल ३.७८ टक्क्यांनी वाढ

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

Tukaram Mundhe: त्वचा उजळवणाऱ्या क्रीम धोकादायक; FDA ने 3 लोकप्रिय ब्रँडवर घातली बंदी, सौंदर्यप्रसाधनांचा धक्कादायक अहवाल

SCROLL FOR NEXT