Crime_Stabbing 
पुणे

लहान मुलांची भांडणं सोडवणं तरुणाला पडलं महागात; तिघांनी केले कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : किरकोळ कारणावरून लहान मुलांमध्ये झालेली भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून तिघांनी तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता.७) रात्री साडेनऊ वाजता औंधमधील कस्तुरबा वसाहतीमध्ये घडली. 

ऋषभ ऊर्फ गुड्डया सुनील गायकवाड (वय 19), आमीर अल्लाउद्दीन शेख (वय 23), अक्षय अर्जुन अडागळे (वय 23), संकेत ऊर्फ अभिषेक अरुण आवळे (वय 19) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दुर्गा गायकवाड (वय 39) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश नागनाथ गायकवाड (वय 24, रा. इंदिरा वसाहत, औंध) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा त्याच्या कुटुंबीयांसह औंधमधील इंदिरा वसाहतीमध्ये राहायला आहे. चार ऑक्‍टोबर रोजी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या लहान मुलांची किरकोळ कारणावरून भांडणे सुरू होती. आकाशने त्यामध्ये मध्यस्थी करून मुलांची भांडणे सोडविली होती. त्याचा राग गुड्ड्या गायकवाड याने मनात धरला. त्यातूनच त्याने बुधवारी रात्री साडे नऊ वाजता आकाशला गाठले. त्यास 'भांडणात तू मध्यस्थी करतो, खूप मोठा भाई झाला का, आता तुला संपवून टाकतो' असे म्हणत गुड्ड्या, आमीर आणि अक्षय या तिघांनी आकाशला मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमध्ये आकाश गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तिघेही तेथून पळून गेले. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आकाशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT