three student of chennai drown in dam in katarkhadak village mulshi damthree student of chennai drown in dam in katarkhadak village mulshi dam 
पुणे

चेन्नईचे तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले ; मृतदेह शोधण्यात यश

सकाळवृत्तसेवा

भुकूम : कातरखडक (ता. मुळशी) येथील बंधाऱ्यामध्ये चेन्नई येथील तीन विद्यार्थी बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह काल (बुधवार) मिळाला तर शोधमोहिमेनंतर यातील दोघांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफचे पथक, अग्निशमनातील जवान आणि पोलिसांना आज (गुरुवार) यश आले. 

उन्हाळी सुटीच्या शिबिरासाठी वीस विद्यार्थी मंगळवारी आले होते. बुधवारी दुपाची चार वाजता ही घटना घडली. येथील बंधाऱ्यामध्ये तेरा वर्षांचा दिनेश राजा, संतोष के. आणि सर्वण्णा हे विद्यार्थी बुडाल्याची माहिती मिळाली. यातील एकाचा मृतदेह काल मिळाला होता. त्यानंतर यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. शर्थीच्या प्रयत्नानंतर उर्वरित दोन मृतदेहही पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

चेन्नई येथील इसीएस मॅट्रिक्‍युलेशन शाळेचे हे विद्यार्थी होते. मंगळवारी दुपारी एक आठवड्याच्या उन्हाळी शिबिरासाठी शाळेचे वीस विद्यार्थी व चार शिक्षक आले आहेत. त्यामध्ये तीन महिला व एक पुरुष आहे. कातरखडक येथे जॅकलीन स्कूल ऑफ थॉट स्वयंसेवी संस्था आहे. येथील स्थानिक शंकर चव्हाण व दिवाकर पांड्या ही संस्था चालवितात. त्यांच्याकडे हे विद्यार्थी आले आहेत.

दुपारच्या वेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक कातरखडक येथील बंधाऱ्याजवळ गेले. त्या वेळी तीन विद्यार्थी पाण्यामध्ये उतरले होते. पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांनी मदतीसाठी ग्रामस्थांना हाका मारल्या. स्थानिक ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दल व पोलिसांच्या सहकार्याने एका मुलाचा मृतदेह सापडला. तर आज इतर दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police : गणेशोत्सव, जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना तातडीचे आदेश; पोलिसांच्या सर्व रजा रद्द

Major Dhyan Chand: ‘ध्यानचंद’ यांच्या नावे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार; ‘भारतरत्न’पासून ते स्वत, वंचितच

PV Sindhu: पी. व्ही. सिंधू पदकापासून थोडक्यात वंचित; जागतिक बॅडमिंटन स्पर्धा, इंडोनेशियाच्या खेळाडूकडून तीन गेममध्ये पराभूत

Asian Hockey Championship: चीनने यजमान भारतीय संघाला झुंजवले; आशियाई हॉकी करंडक, हरमनप्रीत सिंगची हॅट्‌ट्रिक, ४-३ने विजय

Manoj Jarange : दोन दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर पाणीत्याग... जरांगेंचा निर्धार! मुसळधार पावसामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल

SCROLL FOR NEXT