पुणे

रेल्वेच्या खोदकामात तीन वेळा वीजवाहिनीचे नुकसान

CD

पुणे, ता. १५ : रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या खोदकामात चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये महावितरणची भूमिगत उच्चदाब वीजवाहिनी तीन दिवसांत तीनवेळा तोडण्यात आली. परिणामी प्राधीकरण स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे २० हजार ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. यात महावितरणचेदेखील मोठे आर्थिक नुकसान झाले.
महापारेषणच्या अतिउच्चदाब चिंचवड १३२ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या चाकण २२ केव्ही वीजवाहिनीद्वारे प्राधीकरण येथील स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठा केला जातो. या स्विचिंग स्टेशनमधून दोन उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे प्राधीकरण, निगडी व ओटास्कीम परिसराला वीजपुरवठा होतो. रेल्वे विभागाकडून बिजलीनगर येथे अस्तित्वात असलेल्या रेल्वे रुळाच्या बाजूला नवीन रुळ टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. महावितरणची भूमिगत चाकण २२ केव्ही वीजवाहिनी असल्याची माहिती रेल्वे विभागाला देण्यात आली होती. मात्र योग्य काळजी न घेतल्याने खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे तीनही दिवस महावितरणचे प्राधीकरण येथील स्विचिंग स्टेशन बंद पडले. परिणामी प्राधीकरण, निगडी परिसरातील २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
रेल्वे विभागाच्या खोदकामात तोडलेली महावितरणची वीजवाहिनी जमिनीमध्ये तीन ते चार मीटर खोल आहे. खोदकामामुळे झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. अशा स्थितीत तोडलेली वीजवाहिनी दुरुस्त करण्यासाठी महावितरणकडून तीनही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. यात २० मीटर नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली. तसेच तोडलेल्या ठिकाणी एकूण ७ जॉइंट द्यावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT