पुणे

कुपनलिकेत पडलेल्या बालकाला जीवदान

CD

बोरी (जि. परभणी), ता. १९ : कौसडी (ता. जिंतूर) येथे एका शेतात खेळताना बंद कूपनलिकेत तीनवर्षीय बालक पडल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. गावकरी व प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून दोन तासांनंतर बालकास सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
कौसडी (ता. जिंतूर) येथील गट नंबर २५ मधील शेतकरी शेख नदीम, शेख नसीम यांचा मुलगा शेख अधियान (वय ३) शेतात खेळत असताना अचानक बंद असलेल्या कूपनलिकेत पडला. यावेळी तो १५ फूट खोल जाऊन अडकल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. घटनास्थळी दोन जेसीबी बोलवून कूपनलिकेच्या दोन्ही बाजूस खोल २० फूट खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यातून लाकडाची पाटी टाकून बालक खाली जाऊ नये म्हणून कूपनलिका बंद करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नळीद्वारे बालकापर्यंत ऑक्‍सिजनचा पुरवठा केला. बालकास सुरक्षितपणे काढण्यासाठी बचाव पथकाने युद्धपातळीवर दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. अखेर दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी शेख अधियानला सुखरूप बाहेर काढले.

जिल्हा रुग्णालयात उपचार
घटनास्थळी शर्थीचे प्रयत्न करून शेख अधियान यास सुखरूप बाहेर काढताच ग्रामस्थ व कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास घेतला. कूपनलिकेतून अधियान यास बाहेर काढताच तत्काळ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Superstition Law: बुवाबाजीला आळा घालणार कसा? जादूटोणाविरोधी कायदा लागू होऊन १३ वर्षे, नियम करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष

IND vs SL 2nd Test: मोठा धक्का! दुसऱ्या कसोटीतून तीन प्रमुख खेळाडूंची माघार; आता WTC Final मध्ये पोहोचणार कसे?

Maharashtra Education: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची चिंताजनक स्थिती! नववी-दहावीत ९ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य; एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर पुन्हा भाजपला डिवचले

Kupwad MIDC Two dead Shock : सांगलीत क्रेनचा विद्युतवाहिनीला धक्का; दोघांचा जागीच मृत्यू, कुपवाड एमआयडीसीतील घटना

SCROLL FOR NEXT