Three young boys shaved senior citizen woman from fire incident
Three young boys shaved senior citizen woman from fire incident 
पुणे

स्वत:चे घर जळत असताना, तरूणांनी वाचवले शेजारच्या आजीचे प्राण; वाचा सविस्तर बातमी

समाधान काटे

गोखलेनगर (पुणे) : आगोदरच शरिराला झालेला अर्धांगवायू, सोबत एकही नातेवाईक घरात राहत नाही. अर्धांगवायू आजाराला तोंड देत आजी धडपडीने जीवन जगत असताना. मध्यरात्री लागलेल्या आगीत तीन तरूणांनी जिवावर उदार होऊन आजीला आगीच्या तोंडातून बाहेर काढले.

बातम्या ऐकण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी वडारवाडी येथे पांडवनगर पोलीस चौकीच्या शेजारी, बसवेश्वर, कल्याणेश्वर मठाच्या बाजूला दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अचानक आग लागली. गॅस सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. आग मात्र, वाढतच होती. अनेक घरे जळून खाक होत असताना नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी फक्त अंगावरच्या कपड्यासह घराबाहेर पडत असताना. कला सोंडे घरांमधून आरडाओरडा करत होत्या. घराला आतून कडी लावून आजी झोपली होती. आगीने आजीला वेढले होते.प्रत्येकजन आपापला जीव वाचवण्यासाठी धावपळ करत होते. आजी घरातून आरडाओरडा करत होती.आगेने रौद्ररूप धारण केले असताना. शेजारी राहणाऱ्या अदर्श शेजवाळ, भिमराव नाटेकर, चंद्रकांत जगताप या तरूणांनी आजीच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आगीने वेढलेल्या आजीला उचलून घराबाहेर घेऊन आले. या तीन तरुणांनी वेळीच आजीला बाहेर काढले म्हणून, मोठी दुर्घटना टळली. तिघांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे या तिघांच्या घरातील सामान जळत असताना ते न वाचवता आजींना वाचवले.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या पाठीमागच्या घराच्या कोपऱ्यात आग आली होती. मुलांनी मला बाहेर नेत असताना सिलिंडर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, निघालाच नाही. आम्ही बाहेर पडताच. सिलेंडरचा स्फोट झाला. १५ ते २० हजारांची माझी भांडी, दिवाण, पंखा, सिलिंडर, आधार कार्ड, बँकेचं पुस्तक, दवाखान्याची कागदपत्रे जळाली. कपाट घेण्यासाठी पैसे आणले होते तेही जळाले.
- कला सोंडे, आगीतून वाचलेल्या आजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT