पुणे

रयत शिक्षण संस्थेमुळे हजारो गरीब मुले बनली स्वावलंबी 

आदम पठाण

वडापुरी : रयत शिक्षण संस्थेने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. गेली 99 वर्षे ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब मुले या संस्थेत शिक्षण घेऊन स्वावलंबी बनली असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकते यांनी रेडणी येथे बोलताना काढले. 

रेडणी ता. इंदापूर येथे शुक्रवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 131 वी यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी देवकाते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजीराव पाटील होते. सकाळी रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी वृत्तीचा वारकरी आणि कृतीचा धारकरी असले पाहिजे, असे मत प्रमुख वक्ते लक्ष्मण आसबे यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापिका उषा माने यांनी चार वर्गखोल्यांची मागणी केली असता ती पूर्ण करण्याची करण्याचे आश्वासन विश्वासराव देवकाते यांनी दिले.

यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, सुभाष पाटील, हरिभाऊ तरंगे, माऊली हाके, दिलीप तरंगे, नाना पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका उषा माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रीतम शिंगाडे व माधवी भोसले यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT