Water-Supply-Close sakal
पुणे

कोथरूड, बाणेरचे पाणी गुरूवारी बंद

वारजे येथील जलकेंद्राच्या अंतर्गत महावितरणला विद्युत विषयक कामे करायची असल्याने गुरुवारी (ता. ६) संपूर्ण कोथरूड, पाषाण, बाणेर, बावधन, बालेवाडी व वारजे या भागातील पाणीपुरवठा बंद असणार.

सकाळ वृत्तसेवा

वारजे येथील जलकेंद्राच्या अंतर्गत महावितरणला विद्युत विषयक कामे करायची असल्याने गुरुवारी (ता. ६) संपूर्ण कोथरूड, पाषाण, बाणेर, बावधन, बालेवाडी व वारजे या भागातील पाणीपुरवठा बंद असणार.

पुणे - वारजे येथील जलकेंद्राच्या अंतर्गत महावितरणला विद्युत विषयक कामे करायची असल्याने गुरुवारी (ता. ६) संपूर्ण कोथरूड, पाषाण, बाणेर, बावधन, बालेवाडी व वारजे या भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. ७) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार होईल.

महापालिकेतर्फे वारजे येथील एचएलआर व एमएलआर टाकी परिसर, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती एचएलआर टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र,चतुःशृंगी टाकी परिसर येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामांचे नियोजन आहे. वारजे जलकेंद्र येथे उच्च दाब स्वीचगिअरमधून आवाज येत असल्याने त्याचा परिमाण अन्य वाहिनांवरही परिणाम होत आहे. याची दुरुस्ती तातडीने करणे आवश्‍यक आहे, त्यामुळे महावितरणने त्याबाबत महापालिकेला विनंती केली. त्यानुसार गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे, असे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

वारजे जलकेंद्र अखत्यारीत चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर - पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरजनगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, संपूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहननगर, सूस रस्ता, इत्यादी.

गांधी भवन टाकी परिसर - कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, हिंगणे होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बीएसयुपी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचनगंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क- १. आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (काही भाग), शांतीबन, गांधीभवन, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रायमारोज, ऑर्चिड लेन ७ व ९, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपतीनगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता.

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर - बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT