पुणे

तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

CD

तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई, ता. २१ : अभिनेता टायगर श्रॉफच्या मोटारीवरील गोळीबारप्रकरणातील तीन संशयितांना न्यायालयाने आज ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तीनही संशयितांना कोटा येथून ताब्यात घेतल्यावर त्यांना मंगळवारी मुंबईत आणण्यात आले, त्यानंतर आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले. लॉरेन्स बिश्नोई गँगचा अनिल पंडितच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोनीपत येथील रेहान उर्फ सुक्का, बिहारच्या बेगुसराई येथील रितिक कुमार उर्फ रोशन आणि हरियानाचा फुलसिंह यांना कोटा येथून मुंबईत आणण्यात आले. या गुन्हात वापरलेली शस्त्रे शोधून काढायची आहेत. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन नष्ट केली आहे. या कटाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तसेच गुन्ह्याचा हेतू उलगडायचा आहे. आरोपींच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे जमवण्यासाठीही वेळ हवा असल्याने सर्व आरोपींना पोलिस कोठडी आवश्यक असल्याची बाजू पोलिसांनी न्यायालयात मांडली; मात्र बचाव पक्षाचे वकील अजिंक्य मिरगल आणि सत्यव्रत जोशी यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. शस्त्रे जप्त करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच आरोपींची ट्रान्झिट रिमांडदरम्यानच चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने तिघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT