PGR26B03802
पांगरी (ता. बार्शी) : रामलिंग अभयारण्यात वाघाचे ठसे आढळून आले आहेत.
रामलिंग अभयारण्यात पुन्हा ‘वाघोबा’चे दर्शन
सुळकी शेतातील तलावाजवळ पशुपालकाला दर्शन; वन विभागाला पुन्हा आढळले ठसे
सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. १७ : येडशी येथील प्रसिद्ध रामलिंग अभयारण्य परिसरात पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सुळकी शेतातील तलावातून पाणी पिऊन जंगलाच्या दिशेने परतणारा वाघ येडशी येथील रहिवासी तानाजी नलावडे यांच्या निदर्शनास आला.
तानाजी नलावडे हे नेहमीप्रमाणे पहाटे आपल्या गुरांचे दूध काढण्यासाठी शेताकडे जात होते. यावेळी सुळकी शेत परिसरातील तलावाजवळ त्यांना सुमारे १५० ते २०० फूट अंतरावर वाघ दिसून आला. तलावातील पाणी पिऊन वाघ जंगलाच्या दिशेने जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वाघ दिसताच नलावडे यांनी प्रसंगावधान राखत आपल्या वाहनाचा हॉर्न सतत वाजवण्यास सुरुवात केली. हॉर्नच्या मोठ्या आवाजाने वाघाने जंगलातील दाट झाडीत धाव घेतली.
काही दिवसांपूर्वी गायीची शिकार
काही दिवसांपूर्वी याच परिसरात शरद नलावडे यांच्या दुभत्या गायीची वाघाने शिकार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले होते. आताही वाघाचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाने संबंधित परिसराची पाहणी केली. यावेळीही वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रामलिंग अभयारण्य परिसरात वाघाचा वावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असून, शेतकरी व पशुपालकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोट...
सुळकी शेत परिसरात वाघाचे पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले आहेत. त्याची हालचाल कैद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. मागील काही दिवसांपासून हा वाघ सतत भ्रमंती करत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे निश्चित एका ठिकाणी तो फार काळ थांबत नसल्याचे आढळून आले आहे.
- पूनम बधे, वनपरिक्षेत्र अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.