vote 
पुणे

Loksabha 2019 : बारामतीत मतदानाच्या पाश्वभूमिवर कडेकोट बंदोबस्त

मिलिंद संगई

बारामती शहर - लोकसभा निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी यंदा कारवाईचा जोरदार बडगा उगारला आहे. बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण, दौंड, यवत, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, भोर, सासवड, जेजुरी, राजगड या पोलिस ठाण्याअंतर्गत 443 जणांवर निवडणूक कालावधी दरम्यान मतदानाचा हक्क अबाधित ठेवून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी या बाबत माहिती दिली. वरील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्हे दाखल, वारंवार गुन्हे करणारे, ज्यांच्यामुळे निवडणूक प्रक्रीयेत अडथळा निर्माण होईल अशा सर्वांवर यंदा कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. 

तब्बल 4655 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचा बाँड लिहून घेण्यात आला असून, 123 जणांवर दोन वर्षांसाठी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिस विभागाने चोख व्यवस्था केली आहे. निवडणूक प्रक्रीयेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणा-यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशार मीना यांनी दिला आहे. 

विशेष पोलिस महानिरिक्षक सुहास वारके, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस हवालदार राजेंद्र तांदुळकर, शिवाजी बनकर, गुलाब पाटील, सुनीता लोंढे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT