Tikona-Fort 
पुणे

लोकसहभागातून ‘तिकोना’ संवर्धन

ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ - वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन संस्था गेल्या दहा वर्षांपासून मावळ तालुक्‍यातील तिकोना किल्ल्यावर विकासाची छोटी-मोठी कामे करत आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून गडाचा संपूर्ण कायापालट करण्याचा ध्यास या संस्थांनी घेतला आहे.

या दोन्ही संस्थांच्या वतीने गडावर कायमस्वरूपी दोन गडपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ्यांच्या वेशात राहणारे हे गडपाल गडावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे गूळ-पाणी देऊन स्वागत करतात. संस्थेचे पदाधिकारी, गडपाल व पर्यटकांच्या मदतीने वर्षभर दुर्गसंवर्धनाचे काम करतात. गडावर स्वच्छता राखली जात असून, पर्यटकांनाही तसे आवाहन केले जाते.

गडावरील प्रत्येक वास्तूजवळ त्याबाबतची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकड्यांची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था; तसेच प्राथमिक उपचारासाठी प्रथमोपचार पेटी व स्ट्रेचरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याची परवानगी घेऊन दुरवस्था व पडझड झालेल्या वास्तूंच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने गडावरील वाटा व पायऱ्यांचा समावेश आहे. 

या संस्थांनी स्वखर्चाने गडाच्या दरीतून विद्युत व्यवस्था केली आहे. सुरवातीला बांधकामासाठी लागणारे साहित्य पदाधिकाऱ्यांनी वाहून नेले. नंतर सुमारे चार लाख रुपये खर्चून मालवाहतुकीसाठी रोपवे उभारण्यात आला. गडमाथ्यावर श्री वितंडेश्‍वराचे मंदिर असून, त्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. शिवशंभू प्रतिष्ठान व धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठानच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गडाच्या वास्तूला धोका पोचवणारी झाडे-झुडपे वेळच्या वेळी काढली जातात. वृक्ष लागवड व संवर्धनाचे कामही केले केले असून, मोठ्या प्रमाणावर देशी झाडांची लागवड केली आहे. त्याच्या संवर्धनासाठी दोन हजार लिटर पाण्याच्या टाक्‍या, विद्युत मोटार व जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

गडाच्या पायथ्याला असलेल्या गावातील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, दुर्गम व आदिवासी भागातील शाळांना संगणक व ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रमही या संस्थांनी राबवला आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांचे अभिप्राय घेऊन त्याप्रमाणे विविध सुधारणांची कामे केली जात आहेत.

पायऱ्यांचे रविवारी उद्‌घाटन
लोकवर्गणीतून सुमारे आठ लाख रुपये खर्चून व मोठ्या कष्टातून बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या आता पूर्ववत झाल्या आहेत. या कामाचे उद्‌घाटन शिवप्रेमींच्या उपस्थितीत येत्या रविवारी (ता. १७) करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT