samir gaikwad 
पुणे

धक्कादायक! टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे:  टिकटॉक स्टार व लेखक समीर गायकवाड याने रविवारी (ता 21) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणातून त्याने हे पाऊल उचलले, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर प्रसिद्धीच्या जोतात आला होता. सोशल मीडियावर त्याला हजारो तरुण फॉलो करीत आहेत. तसेच तो चांगला लेखकही होता. 

22 वर्षीय समीर हा वाघोलीतील निकासा सोसायटी राहायला होता. तर वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण सुरू होते. त्याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली.

समीर याने गळफास घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरुन जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही.

समीर हा ब्लॉगर म्हणूनही तरुणाईमध्ये लोकप्रिय होता.  तसेच तो वर्तमानपत्रात देखील लिहीत. त्यांच्या ललित लेखनाचे अनेक चाहते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT