sharad pawar sakal
पुणे

Baramati News : वेळेचा सदुपयोग आणि सखोल अभ्यास करा - शरद पवार

राजकीय जीवनाच्या सुरुवातीला जपान, कॅनडा व अमेरिकेचा दौरा केला. वेळेचा सदुपयोग, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करणे व कमीत कमी बोलणे हे गुण घेण्यासारखे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राजकीय जीवनाच्या सुरुवातीला जपान, कॅनडा व अमेरिकेचा दौरा केला. वेळेचा सदुपयोग, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करणे व कमीत कमी बोलणे हे गुण घेण्यासारखे आहेत.

बारामती: राजकीय जीवनाच्या सुरुवातीला जपान, कॅनडा व अमेरिकेचा दौरा केला. वेळेचा सदुपयोग, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करणे व कमीत कमी बोलणे हे गुण घेण्यासारखे आहेत. जपान, कॅनडा व अमेरिका येथील पंतप्रधान व सीनेटर कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली.

त्याचा फायदा मला पुढील सार्वजनिक जीवनात झाला. अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तारांगण युवा फेस्टमध्ये आज शरद पवार यांची तुषार जगताप व प्राची जोशी या विद्या प्रतिष्ठानच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीतील एका प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार यांनी ही माहिती दिली.

जपान, कॅनडा या देशातील पंतप्रधान कार्यालयात व पंतप्रधाना समवेत एक दिवस काम करण्याची संधी मिळाली. तसेच अमेरिकेतील सिनेटर कार्यालयात देखील काम करण्याची संधी मिळाली. येथील कामकाज कसे चालते हे युनेस्कोमुळे मला जवळून पाहता आले त्याचा उपयोग मला भविष्यातील राजकीय जीवनात मोठ्या प्रमाणात झाला.

जपानी लोकांचा वक्तशीरपणा, सखोल अभ्यास करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि कमी बोलून अधिक काम करणे हे गुण घेण्यासारखे असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली हे शरद पवार यांनी याप्रसंगी नमूद केले गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते तेव्हा आपण प्रवरानगर येथे शाळेत नववी शिकत होतो तेव्हा एका शिक्षकांचा पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबार मृत्यू झाला त्यावेळेस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहात आपण सर्वप्रथम सहभागी झालं होतं हे आपल्या राजकीय जीवनाचे सुरुवात होते असे त्यांनी नमूद केले.

शालेय जीवनामध्ये अभ्यासात माझे मन फारसे रमत नसे, अभ्यासाव्यतिरिक्त मित्र गोळा करणे व लोक जमा करणे यात मला अधिक रस होता. भविष्यात त्या गुणाचा मला राजकीय प्रवासात फायदा झाला असे शरद पवार यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मुलींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कर्तृत्व असते, फक्त त्या कर्तृत्वाला योग्य संधी देण्याची गरज असते, असे शरद पवार यांनी सांगितले. ग्रामीण भागातून शहरी भागात जाताना फारसा बदल करण्याची काही गरज नसते आपल्या अंगी असलेले कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची क्षमता असणे गरजेचे असते असा कानमंत्र त्यांनी मुलांना दिला.

लातूरच्या झालेल्या भूकंपाच्या संदर्भात शरद पवार यांनी सविस्तर विवेचन करताना कशी मदत पोहोचविली व कसे लातूरला पुन्हा उभे केले याचा किस्सा विद्यार्थ्यांसमोर विशद केला. याची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली हेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT