पुणे

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील 15 मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. 

दहावीची परीक्षा 20 मार्च, तर बारावीची परीक्षा 30 मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

Chandrakant Patil : नीट पेपरफुटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांचं 'आंबा चोरी'चं उदाहरण; विरोधकांकडून जोरदार टीका

Live Updates Marathi : मारहाण प्रकरणात वकिलांची बाजू समोर, स्वसंरक्षणासाठीच प्रतिकार केल्याचा दावा

डोहाळे जेवणादिवशी सायलीला अटक; गंभीर आरोप, महीपतची एंट्री, 'ठरलं तर मग'चं कथानक बदलणार, प्रोमो पाहून प्रेक्षक शॉक

Mumbai Local Megablock: रविवारी सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; कसे असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT