Time to decide to relocate Market Yard ncp Sharad Pawar pune
Time to decide to relocate Market Yard ncp Sharad Pawar pune sakal
पुणे

पुण्यातील मार्केटयार्ड होणार स्थलांतरीत?; शरद पवारांनी दिले संकेत

प्रवीण डोके

पुणे : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नाना-भवानी पेठ येथून गुलटेकडी मार्केटयार्ड येथे बाजार स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा मार्केट स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे का याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कारण, मार्केट यार्डात येणार माल आणि होणारी गर्दी हे पाहता उद्याचा विचार करण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून लिहिलेल्या ‘व्यापाराचे विद्यापीठ’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी, ते बोलत होते. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी, उद्योजक संजय घोडावत, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मणियार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी, गुलटेकडी मार्केटयार्डाला विद्यापीठात रुपांतरीत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या मार्केटयार्डाशी संबंधीत विविध क्षेत्रातील 31 मान्यवरांना ‘मास्टर ऑफ बिझनेस’ने सन्मानित करण्यात आले. कॉन्व्होकेशन कॅप, सन्मानचिन्ह, पुस्तक असे सन्मानाने स्वरूप होते.

पवार म्हणाले, मार्केटयार्ड स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी, या निर्णयाला मोठा विरोध झाला. परंतु बाबा पोकर्णा यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित येऊन यावर तोडगा काढला. त्यांनतर खर्‍या अर्थाने व्यापार्‍यांची वृद्धी झाली. व्यापारी वर्गाने भविष्याचा विचार करून कष्ट करावे. ते करताना दर्जामध्ये तडजोड न करण्याची वृत्ती त्यामध्ये असावी. ग्राहक हाच परमेश्वर असल्याची भूमिका अंत:करणात ठेवून त्या भावनेने काम करण्याची गरज आहे. व्यापारी, उद्योजकांच्या दूरदृष्टीमुळे खर्‍या अर्थाने देशाचा विकास होत गेला आहे.

यावेळी, पवार यांनी शून्यातून विश्व निर्माण करणारे किर्लोस्कर, अंबानी, अदाणी, जे आर डी टाटा, बजाज आदी व्यावसायिकांसोबतचे अनुभव उपस्थितांना सांगितले. जे कष्ट, प्रामाणिकपणा, सत्य या तत्त्वावर कायम काम करत राहिले ते यशस्वी झाल्याचे देखील पवार म्हणाले. यावेळी, संजय घोडावत, विद्याधर अनास्कर, विठ्ठल मणियार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व सन्मानितांच्या वतीने राजेश शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

१२ मान्यवर बीएमसीसी कॉलेजचे माजी विद्यार्थी

मास्टर ऑफ बिझनेस’ सन्मानित करण्यात आलेल्या ३१ पैकी १२ मान्यवर हे बीएमसीसी कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. व्यवसायाच्या क्षेत्रात स्वप्ने साकारण्याची धडपड करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यावसायिकांनी बीएमसी कॉलेजमधे शिष्यवृत्ती देण्यास सुरवात करावी, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. त्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये मदतीची घोषणा देखील केली.

‘मास्टर ऑफ बिझनेस’चे मानकरी

विद्याधर अनास्कर, विठ्ठलशेठ मणियार, डॉ. बाबा आढाव, अ‍ॅड. एस. के. जैन, सुनील पवार, अ‍ॅड. अभय छाजेड, राजेश शहा, विजय भंडारी, कृष्णकुमार गोयल, श्याम अगरवाल, बंकटलाल रुणवाल, विलास भुजबळ, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेश फुलफगर, मोहन ओसवाल, राजेंद्र गुगळे, दीपक बोरा, अजित सेठिया, प्रवीण चोरबोले, राजेश सांकला, रायकुमार नहार, राजकुमार चोरडिया, प्रकाशशेठ पारख, राजेंद्र बोरा, हर्षकुमार बंब, बाळासाहेब कोयाळीकर, कन्हैय्यालाल गुजराथी, राजेंद्र चांडक, सतीश गुप्ता, दिलीपभाई मेहता यांना ‘मास्टर ऑफ बिझनेस’ने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT