पुणे

टीजेएसबी सहकारी बँकेत भवानी सहकारी बँक विलीन

CD

ठाणे, ता. १२ : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये भवानी सहकारी बँक लिमिटेडच्या विलीनीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० एप्रिलला विलीनीकरणाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे टीजेएसबी बँकेचा विस्तार आता सात राज्यांतील १७१ शाखांपर्यंत झाला आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टीजेएसबी बँकेने २५ हजार ३६० कोटींचा एकूण व्यवसाय नोंदवला आहे. यात १६ हजार २४४ कोटींच्या ठेवी आणि नऊ हजार ११६ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या विलीनीकरणामुळे मुंबई शहरात बँकेचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, ‘‘हे विलीनीकरण केवळ विस्तार नसून सहकारी बँकिंग क्षेत्रात आमचे स्थान मजबूत करणारे धोरणात्मक पाऊल आहे. याद्वारे आम्ही मोठ्या ग्राहकवर्गाला दर्जेदार सेवा देऊ.’’ उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी म्हणाले, ‘‘भवानी बँकेच्या ग्राहकांना आता आधुनिक डिजिटल सुविधा मिळतील.’’ मुंबईतील शाखांचे जाळे अधिक मजबूत झाल्याने ग्राहकांना अत्याधुनिक सेवा नियमितपणे देता येईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT