To live stress free life Art should be aware music and singing police Sunil Yadav pune  sakal
पुणे

तणावरहित जीवन जगण्यासाठी संगीत आणि गायन कला अवगत केली पाहिजे - सुनील यादव

पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी २४ बाय ७ अलर्ट असल्याने त्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी गायन आणि संगीत कला जोपासण्याची नवी संकल्पना लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सुरू केली

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : अलीकडे डे साजरा करण्याची पद्धत रूढ होत आहे. भारतामध्ये संगीत कलेला महत्त्वाचे स्थान आहे. तणावरहित जीवन जगण्यासाठी संगीत आणि गायन कला अवगत केली पाहिजे, असे मत सहायक पोलीस आयुक्त सुनील यादव यांनी व्यक्त केले. बहुतांश ठिकाणी तरुणाईवर कामाचा ताण वाढत आहे. पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी २४ बाय ७ अलर्ट असल्याने त्यांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी गायन आणि संगीत कला जोपासण्याची नवी संकल्पना लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सुरू केली आहे. चार आठवड्यांपासून जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आवडीची गाणी म्हणत कार्यक्रमात रंगत वाढविली.

प्रत्येकामध्ये वेगळी कला असते, ती जोपासत आत्मिक समाधान मिळविण्याचा नामी प्रयोग सुरू केल्याने पोलीस वर्गामध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. याप्रसंगी सहायक पोलीस आयुक्त सुनील यादव, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, सुधीर दार्वेकर, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धोपावकर, प्रकाश गुप्ते, जाकीर शेख, रफिक शेख, स्मिता बनसोडे, शांतता कमिटी सदस्य विजय भोसले, पारुल शहा, लष्कर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी गायक व गायिका आदी मान्यवर उपस्थित होते. गायन औपचारिक किंवा अनौपचारिक, व्यवस्था केलेले किंवा सुधारित असू शकते. गायन करण्यामागे विविध कारण असू शकतात.

छंद, आनंद, सांत्वन किंवा विधी ,संगीत शिक्षणाचा भाग म्हणून किंवा व्यवसाय म्हणून हे हेतू असतात. गायनातील उत्कृष्टतेसाठी वेळ, समर्पण, सूचना आणि नियमित सराव आवश्यक आहे. जर सराव नियमितपणे केला गेला तर ध्वनी अधिक स्पष्ट आणि मजबूत होऊ शकते. व्यावसायिक गायक सहसा शास्त्रीय किंवा रॉकसारख्या एका विशिष्ट संगीत शैलीच्या भोवती आपले कारकीर्द तयार करतात.व्यावसायिक गायक सहसा आवाजाचे प्रशिक्षण शिक्षकांकडून घेतात.गायनाने मनातील भावना व्यक्त करता येतात. त्यामुळे इतर पोलीस स्टेशनमध्ये ही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबवायला काही हरकत नाही. असे मत कदम यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT