पुणे

अवसरी खुर्दमध्ये गुटखा साठा जप्त

CD

मंचर, ता. २८ : अवसरी खुर्द-भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा मंगळवारी (ता. २७) अन्नसुरक्षा अधिकारी व मंचर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत १० लाख ३० हजार ७४० रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि चार लाख रुपयांचे वाहन, असा एकूण १४ लाख ३० हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच वाजता भोरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. नवनाथ कैलास भोर आणि अक्षय लहू भोर यांच्याशी संबंधित घरात तसेच वाहनात (एमएच ०४ केएफ ८३८९) प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी अभिजित अशोक झोडगे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती पोलिसांना द्यावी. युवकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकायदा व्यावसायिकांवर यापुढे धडक कारवाई सुरू राहील.
- महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक, मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

मतदार यादीत नाव असताना फॉर्म ६ कशाला? SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

SCROLL FOR NEXT