Pune Rains  
पुणे

Pune Rains : पुणेकरांच्या डोक्याची आज मंडई होणार कारण...

सकाळ वृत्तसेवा

Pune Rains : पुणे : पुणेकरांनो, आज सायंकाळी लवकर निघाच. त्याला कारणही तसेच आहे. आज सायंकाळी पुण्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जरी पाऊस नाही आला तरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महात्मा फुले मंडई सभा होणार आहे. त्यामुळे पाऊस पडो वा न पडो तुमची कोंडी होणारचं आहे.

आज सायंकाळी 6 वाजता मंडईत राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांची सभा झाली तर गर्दी असणारचं. आणि गर्दी आहे म्हणजेच वाहतूक कोंडी होणारचं. तुम्ही आज मंडई, शिवाजीरस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्याने येणार असाल तर पर्यायी रस्त्यांचा वापर करा. 
 
दरम्यान, शहरात आज सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसामुळे गेल्या आठवड्यात त्यांची सभा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेवर आजही पावसाचे सावट असणार आहे.

आज पाऊस झाला तर राज ठाकरेंची सभा रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, पाऊस येणार म्हणजे गैरसोयही होणारचं. त्यामुळे आज छत्री, रेनकोट सोबत असु द्याच पण शक्यतो, आज वेळीच घरी पोहचा.

आज काहीही होऊ शकते. पाऊस आला तरी राज ठाकरे सभा घेऊ शकतात. कारण या आधी त्यांची सभा पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे कदाचित आणखी एक सभा ते रद्द करणार नाही. म्हणूनचं पुणेकरांनो, तुम्ही तयारीत रहा. आज पाऊस आला काय नाही आला काय? राज ठाकरेंची सभा झाली काय नाही झाली काय तरी तुम्ही अडकणारचं आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT