Corona Vaccination
Corona Vaccination Sakal
पुणे

पुणे शहरातील लसीकरण आज बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेकडील (Pune Municipal) कोव्हॅक्सीन (Covaxin) व कोव्हीशील्ड लसीचे (Covishield Vaccine) डोस (Dose) संपल्याने रविवारी (ता. ६) लसीकरण (Vaccination) होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. (Today Corona Vaccination Close in Pune)

महापालिकेला कोव्हीशील्डचे २४ हजार डोस मिळाले होते, त्यानुसार तीन दिवस शहरात लसीकरण करण्यात आले. तर कोव्हॅक्सीनचे सुमारे साडे तीन हजार डोस उपलब्ध होते. या दोन्ही लसी संपल्याने व शासनाकडून नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने रविवारी लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यास सोमवारचे नियोजन केले जाईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

शहरात २५ हजार जणांचे लसीकरण

आज (शनिवारी) महापालिकेतर्फे ७७ ठिकाणी लसीकरण झाले, तर खासगी रुग्णालयातर्फे कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण केले गेले, त्यात २४ हजार ९९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये १९ हजार ७०५ १८ ते ४४ वयोटातील तरुणांचे लसीकरण झाले आहे. तर २६३ आरोग्य कर्मचारी ४७२ फ्रंटलाइन कर्मचारी यांचे लसीकरण झाले. १ हजार ४९६ ज्येष्ठ नागरिक, ३ हजार १३७ ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण झाले. शहरात आत्तापर्यंत एकूण ११ लाख ७७ हजार ९५४ जणांचे लसीकरण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT