Anand Dave
Anand Dave Team eSakal
पुणे

"आज कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू"; आनंद दवेंचा राष्ट्रवादीला इशारा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका विधानावरुन ब्राह्मण महासंघानं पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी महासंघाचे नेते आनंद दवे हे आक्रमक झाले होते. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना आज आम्ही कार्यालयात घुसलो आहोत, उद्या घराघरात घुसू असा इशाराही दिला. (today enter your office tomorrow enter your house Anand Dave warns NCP)

दवे म्हणाले, मी माझी बायको तुम्हाला देत आहे असा मंत्राचा अर्थ होतो का? शेकडो वर्षांपासून हा मंत्रोपचार केला जात आहे. इतके दिवस तुमच्यापैकी कोणाला सुचलं नाही का? की हा मंत्र चुकीच्या पद्धतीनं बोलला जातोय. हा मंत्र नाहीए, तो लग्नात बोलला जात नाही. तुम्हीचा चुकीचा मंत्र सांगत असून तो चुकीच्या पद्धतीनं मांडत आहात. तुम्ही पौराहित्य केलंय का? तुम्हाला मंत्रोपचाराचा काही अधिकार आहे का? भावना कळतात का तुम्हाला? हा हिंदु धर्माचा अपमान असून फक्त ब्राह्मण समाज पौरोहित्य करत नाही, माळी, लिंगायत इतर समाजही करतात. हा त्या सगळ्यांचा अपमान आहे, हा हिंदु धर्मियांचा अपमान आहे. हे आम्ही सहन करणार नाही. आज आम्ही कार्यालयात घुसलो उद्या घराघरात घुसू हेच मला सांगायचं आहे" स्पष्टीकरणं मागणारे तुम्ही कोण? तुमच्याकडे स्पष्टीकरण मागावं इतकी आमचा स्तर खाली आलेला नाही, असंही यावेळी दवे म्हणाले.

पुरंदरे यांचं पत्र व्हायरलं केलं. तरीही तुमचे नेते मुग गिळून गप्प बसले आहेत. शरद पवारांचा बाबासाहेब पुरंदरेंची आरती उतरवण्याचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला आम्ही पाठवला आहे. यावर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं. एवढी वर्ष सत्तेत येऊ शकत नाही, कारण तुम्ही जातीयवादाचं विष पसरवलंय हे आता थांबावं हीच आमची भूमिका आहे, असंही यावेळी आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT