पुणे

मतदान जेव्हा ‘गुप्त’ राहात नाही! शासकीय कर्मचाऱ्यांवर अनेदा वेळ; जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही हक्कांवर गदा

CD

यवत, ता. ९ : सार्वत्रिक मतदान असो व सहकारी संस्थांचे असो, ते गुप्त राहणे कायद्याला अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग व तत्सम यंत्रणेकडून होतो. मात्र, असे असले तरी या मतदान प्रक्रियेत कधी कधी अशी वेळ येते की जेव्हा मतदान गुप्त राहात नाही! त्यामुळे गुप्तपणे मतदान करण्याऱ्या मतदारांच्या हक्कावर गदा येते. होय, शासकीय कर्मचाऱ्यांवर अशी वेळ अनेकदा येते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

यवत येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावण्याची वेळी दोन शिक्षकांवर काही वर्षांपूर्वी आली होती. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभागानुसार मतदान केले जाते. प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या मोजकीच असते. त्यामुळे झाडून सर्वांचे मतदान करून घेण्यावर भर दिला जातो. पोस्टल मतदानाचीही काळजी घेतली जाते. निवडणुकीत जोरदार चुरस असते. यवत येथे अशाच एका प्रभागात मोठी चुरस झाली. एक उमेदवार केवळ एक मताने विजयी झाला होता. या प्रभागात जिल्हा परिषदेची दोन शिक्षकी प्राथमिक शाळा आहे. या दोन शिक्षकांची मतदान अधिकारी म्हणून इतरत्र नेमणूक होती. त्यांची मते वाया जाऊ नये म्हणून पोस्टल मतदानाचे सोपस्कर आधीच पार पाडले होते. ही मते कमी असल्याने एरवी त्याकडे कोणाचे फार लक्ष दिल नाही. मात्र, पराजित होणाऱ्या उमेदवाराला एका मताचा पराभव जिव्हारी लागणारा होता. म्हणून पोस्टल मतांबाबतची उत्सुकता काही क्षणात शिगेला पोहोचली. ही मते उघडण्यात आली. तेव्हा ती दोन्ही मते पराभूत उमेदवाराला होती.

आपल्यावर आलेली एकमताने पराभवाची नामुष्की विरोधकावर गेली होती. मात्र, विजयातील वाट्यापेक्षा पराभवाचे सर्व खापर फोडणारेच पुढे आले होते. पुढील काही दिवस या शिक्षकांना टोमणे ऐकावे लागले. मतदान गुप्त न राहिल्याचा तो परिणाम होता. हे सर्व सांगण्याचे कारण नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत ज्यांच्या विजयाची फारच चर्चा झाली. त्या प्रदिप कंद यांना झालेल्या मतांचे विश्लेषण पाहिले, तर वेल्हे तालुक्यातील दोन मतांच्या गुप्ततेवर पाणी पडलेले दिसते.
महाविकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या वेल्हे तालुक्यातील दोन्ही मते प्रदिप कंद यांनी पडली आहेत. ती कोणाची हे गुप्त न राहिल्याने पक्षाशी गद्दारी केलेल्या इतरांना काही ना काही कारण सांगता येण्यासारखे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT