पुणे

खोर बलात्कारप्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी

CD

यवत, ता. ३१ : खामगाव (ता. दौंड) येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर खोर (ता. दौंड) येथे पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. याबाबत महिलेने दिलेल्या वर्णनावरून यवत पोलिसांनी अल्पकालाबधीत पाचही आरोपींना जेरबंद केले होते. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची (५ फेब्रुवारीपर्यंत) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.

या आरोपींमध्ये अजय बापू चौधरी (वय २२), किरण रोहिदास चौधरी (वय २७), शंकर संपत चौधरी (वय २६), नवनाथ नाना कोकरे (वय ३२, सर्व रा. खोर) व संतोष भगवान चव्हाण (वय ३२, रा. गिरीम, ता. दौंड) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी अटक करून दौंड न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भांडगाव (ता. दौंड) येथे हॉटेलात जेवण करण्यासाठी पीडित महिला आपल्या पतीसोबत आली होती. भावाचा अपघात झाला असल्याचे खोटे सांगून अजय चौधरी याने पिडीतेला आपल्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर या महिलेस खोर गावच्या हद्दीतील इनामाचा डोंगर या निर्जनस्थळी नेले. ‘पतीसह दोघांना जीवे मारू,’ अशी धमकी देऊन महिलेस गप्प बसण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने आपल्या इतर चार सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले. या सर्वांनी या महिलेवर तीच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने अत्याचार केले. शनिवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहा ते रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली होती.
दरम्यान, पीडित महिला दलित असल्याने इतर गुन्ह्यांसोबत आरोपींविरूद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT