पुणे

भांबर्डे सोसायटीच्या अध्यक्षपदी दिघे

CD

माले, ता.११ः भांबर्डे (ता.मुळशी) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्‍या अध्‍यक्षपदी दत्‍तात्रेय भाऊ दिघे यांची, तर उपाध्‍यक्षपदी विलास गणपत दिघे यांची बिनविरोध निवड झाली. निर्धारित वेळेत दोन्‍ही पदांसाठी प्रत्‍येकी एकच अर्ज आल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड जाहीर करण्‍यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून एम.एम.नरुटे, सहायक म्‍हणून प्रवीण शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचीत संचालक अंकुश दहिभाते, शंकर वायकर, किसन दिघे, दत्तात्रेय कुंभार, पांडुरंग गवारी, संतोष कदम, मारुती कुडले, बबन ओव्हाळ, संगीता दिघे, हिराबाई दिघे, सामाजिक कार्यकर्ते जयराम दिघे, धोंडीबा दिघे, शंकर दिघे, राम काळोखे, योगेश मासवड, सुभाष हरगणे आदी उपस्थित होते.
जिल्‍हा दूध संघाचे माजी अध्‍यक्ष रामचंद्र ठोंबरे, उद्योजक व माजी सरपंच विजय ढमाले आदींनी नवनिर्वाचीत अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व संचालक मंडळास शुभेच्‍छा दिल्‍या. सोसायटीचे कार्यक्षेत्र अतिशय दुर्गम, डोंगराळ व अतिपावसाचे भागात मोडते. आडगाव, घुटके, भांबर्डे, तैलबैल, बार्पे, तिस्‍करी गावांतील सुमारे ५०० सभासद आहेत. मागील वर्षी ८५ लाखाचे कर्ज वाटप करण्‍यात आले होते.
----
00368

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT