पुणे

टाळ मृदंगाच्या गजरात सोनेश्र्वराचे दर्शन

CD

डोर्लेवाडी, ता.१ : सोनगाव (ता.बारामती) येथे टाळ मृदंगाच्या गजरात व अखंड शिवनामाच्या भजनात तल्लीन होत भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त पवित्र कऱ्हा नीरा नदीच्या संगमावर वसलेल्या सोनेश्वराचे दर्शन घेतले.
यंदा कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून महाशिवरात्र उत्सवास परवानगी दिल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. येथील मंदिरात पूजा महाभिषेक झाल्यानंतर पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. दिवसभर परिसरातील भजनी मंडळांनी भजने सादर केली. देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप व दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना पोलिस पाटील चेतन ठोंबरे यांच्या वतीने खिचडीचा प्रसाद देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने शुद्ध पाणीपुरवठा, लाइट व्यवस्था, गावातील स्वच्छता करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
संदेश गीते व मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोक गीते, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, सरपंच शुभांगी देवकाते, कुंदन देवकाते, काशिनाथ गोफणे, बापूराव बोडरे, सुभेदार मळेकर, अल्लाभाई मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

भाविकांनी घेतला पर्यटनाचा आनंद
सोनेश्वराचे पुरातन मंदिर हे कऱ्हा नीरा नदीच्या संगमावर आहे. शिवाय दोन्ही नद्यांना यात्रेवेळी मुबलक पाणी असल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून होडीची सोय असते. तसेच गीते वस्ती कडून सरळ रस्ताही आहे, मात्र भाविक दर्शनाबरोबर पर्यटनाचाही आनंद घेता यावे यासाठी होडीतून जाणे अधिक पसंत करतात.
.............................
00465

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT