पुणे

अपुऱ्या कामांमुळे अपघाताचा धोका

CD

पिरंगुट, ता. ५ : येथील (ता.मुळशी) पुणे-कोलाड रस्त्याच्या घाटातील अपुऱ्या कामांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच दररोज सकाळी संध्याकाळी वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे येथील घाट रस्त्यातील कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी पिरंगुट ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांत सलग पाच अपघात झाल्याने काही वाहनचालक व प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अपुऱ्या कामांकडे रस्ते विकास महामंडळाकडे सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच राहुल पवळे, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी लक्ष वेधले. येथील वनालिका गृहनिर्माण संस्थेच्या पूर्वेकडील घाट रस्त्यातील एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले. मात्र, पश्चिम बाजूकडील काम अपूर्ण आहे. या बाजूकडील एक मोरी पूर्ण झाली असून, अद्याप एक मोरी पूर्ण करायची आहे. त्यामुळे रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. एकच बाजू उंच असल्याने या रस्त्यावरून पिरंगुटला उताराने खाली जाताना दुचाकी तसेच इतर वाहने थेट अपुऱ्या असलेल्या जुन्या रस्त्यावर खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनांचा प्रकाश दुचाकीस्वारांना अजिबात रस्ता दिसत नाही. त्यामुळे दुचाकी सिमेंटच्या रस्त्यावरून थेट खाली पडते. त्यामुळे वारंवार अपघात होऊ लागलेले आहेत.

पुण्याहून वेगाने आलेली वाहने थेट मोरीच्या अपुऱ्या बांधकामावर येऊन आदळतात. त्यामुळे ही मोरीही तातडीने बांधावी, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. तसेच लवळे फाटा ते पिरंगुट पोलिस मदत केंद्रासमोरील ओढा या दरम्यान या रस्त्याला बंदिस्त गटार उभारले जात आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने प्रत्येकी दहा मीटर रुंदीकरण केले जाणार आहे. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेजची उंची ही रस्त्याच्या समपातळीत ठेवण्याची मागणीही ग्रामपंचायतीने रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे.

कोलाड रस्त्याच्या अपुऱ्या कामांमुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. तसेच खराब रस्ता असल्याने आमचेकडे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून हॅाटेलला येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने रस्ता तातडीने पूर्ण करावा.
-ज्ञानेश्वर पवळे, हॉटेल व्यावसायिक, पिरंगुट

पिरंगुट येथील घाट रस्त्याच्या बाजूला सिमेंट काँक्रिटचे बंदिस्त गटार बांधण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल. अपघात होणार नाही यासाठी
कंत्राटदाराला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. अपघाताच्या अनुषंगाने उपाय योजना करणे बाबत पुनश्च सूचित केले आहे.
- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ


00284

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT