पुणे

पुलांच्या अपूर्ण कामामुळे अपघातांत वाढ

CD

पारगाव, ता. २८: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाचे काम सुमारे सहा आठवड्यापासून बंद आहे. अपूर्ण अवस्थेत बंद पडलेल्या रस्त्यावरील पुलांचे व मोऱ्यांच्या कामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे रस्त्यावरून जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी तालुक्यातील नागरिकांतर्फे करण्यात आहे.
अष्टविनायक महामार्गातील रांजणगाव ते ओझर हा महामार्ग तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, पारगाव, नागापूर या गावातून जात आहे. या रस्त्यातील रोडेवाडीफाटा, खारावस्ती व भोकरवाडी (नऱ्हेवस्ती) येथील पुलाचे काम अनेक आठवड्यापासून अपूर्ण अवस्थेत बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकदा अशा ठिकाणी अपघात घडले आहे. अपघातामध्ये काहींना जीव गमवावा लागला आहे. हा रस्ता पारगावातून जात आहे या रस्त्याचे काम सुमारे वर्षभरापासून सुरू आहे. भीमाशंकर साखर कारखाना ते घोडनदी पुलापर्यंत असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे काम अनेक महिन्यापासून सुरू आहे. त्यासाठी मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. मातीचे ढिगारे रस्त्याच्या कडेला तसेच पडून आहेत गटारीच्या काम अर्धवट पडले आहे लोखंडी गज तसेच उभे आहेत. या रस्त्यावर मोटारसायकल घसरून अनेकदा अपघात घडले आहे संपूर्ण रस्त्याचेच काम सुमारे दीड महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले तेव्हा पासून संबंधित ठेकेदाराने बंद ठेवले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

00580

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT