पुणे

शेटफळगढेत सरपंचांकडून मोफत पाणीपुरवठा

CD

शेटफळगढे, ता. ५: शेटफळगढे (ता. इंदापूर) गावच्या सरपंच रूपाली संतोष वाबळे यांनी टंचाईच्या काळात सलग दोन वर्ष टँकरने मोफत पाणी पुरवठा करून नागरिकांना दिलासा आहे.

शेटफळगढे येथील खडकवासला कालव्याच्या ४१ क्रमांकाच्या वितरीकेलगत पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहेत. जून ते जानेवारी या कालावधीत या दोन्ही विहिरींना चांगले पाणी असल्याने गावात पाणी टंचाई भासत नाही. मात्र उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारी ते पाऊस पडेपर्यंत जलस्रोत आटू लागल्याने टंचाई निर्माण होते. याच कालावधीत खडकवासला कालव्याला आवर्तन आल्यानंतर साधारणपणे उन्हाळ्यात पंधरा ते वीस दिवस पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू राहतो. मात्र त्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना लांबून पाणी आणावे लागते. अशावेळी गावातील टंचाईवर मात करण्यासाठी गावच्या सरपंच वाबळे फेब्रुवारी २०२१ ला सरपंच पद स्वीकारल्यापासून स्वतःच्या टॅंकरने मोफत पाणीपुरवठा करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे.

ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होऊ नये, म्हणून टंचाईच्या काळात आमच्या वैयक्तिक टॅंकरने गावाला पाणीपुरवठा करीत आहे.यासाठी माझे पती संतोष यांची साथ मिळत आहे. यापुढील काळातही पाणी टंचाई दूर होईपर्यंत गावाला टँकरने पाणी पुरवठा करणार आहे.
-रूपाली वाबळे,सरपंच ग्रामपंचायत शेटफळगढे (ता.इंदापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT