पुणे

पांढरेवाडीत रांगोळीतून साकारले शिवराय

CD

कुरकुंभ : पांढरेवाडी (ता. दौंड) जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पोलिस पाटील विलास येचकर यांनी सव्वाशे किलो रांगोळीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे ५०×६० फुटाचे चित्र शिवप्रेमींच्या आर्कषणाचा केंद्र बिंदू बनले.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी, खडकी, मळद परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींकडून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, मिरवणूक, विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. मळद, कुरकुंभ, पांढरेवाडी, खडकी परिसरात शिवप्रेमींकडून शिवरायांची प्रतिमा व पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच ध्वनीवर्धकांवर पोवाडे व छत्रपतींच्या कार्याची महती सांगणारी गाणी व जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. जयंतीचे औचित्य साधून क्रिकेट व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेषभूषा केले विद्यार्थी व त्यांची भाषणे व स्पर्धांचे आयोजन केले होते. महाराजांच्या प्रतिमेची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

रेखाचित्र पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी
पोलिस पाटील विलास येचकर यांना रांगोळी साकारण्यासाठी १२५ ते १३० किलो रांगोळीची आवश्यकता भासली. यासाठी येचकर यांना शिवजयंती उत्सव समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शिवप्रेमी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. महाराजांचे भव्यदिव्य काढलेले रेखाचित्र पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी गर्दी केली होती.
-------------------------------------------
00717

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT