पुणे

कुरकुंभ येथे मनसेचा रास्ता रोको

CD

कुरकुंभ, ता. २९ : मनमाड - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे दौंड - कुरकुंभ दरम्यानचे कुरकुंभ घाटातील अपूर्ण काम तसेच खड्डयांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दौंड तालुका व शहराच्या वतीने कुरकुंभ घाटातील अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कुरकुंभ घाटात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कुरकुंभचे सरपंच आयुब शेख, याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, प्रतिभा डेंगळे, सागर पाटसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. पाटसकर पुढे म्हणाले, की सरकारी अधिकाऱ्यांना एखाद्या कार्यकर्त्यांने विरोध केला तर त्यांच्याकडून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जात आहे. मात्र जनतेच्या हिताच्या रस्त्याकामाला काही व्यक्तीने अडथळा गेल्याचे कारण पुढे केले जाते हे हास्यास्पद आहे.
यावेळी सचिन कुलथे, आयुब शेख, प्रतिभा डेंगळे, सुनील आवटे, सागर पाटसकर आदींनी मनोगत व्यक्त केले. रस्ता रोको आंदोलनामुळे पाऊणतास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. यावेळी सनी सोनार, दिलीप भागवत, नंदकिशोर मंत्री, संदीप बोराडे, जमीर सय्यद, राजू चातू आदी उपस्थित होते. आंदोलन प्रसंगी रस्ते विकास महामंडळ व रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित रस्त्याचे काम सुरू करण्याची आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

00747

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT