पुणे

मोरगावला माघी यात्रेत मूर्ती स्नान नाही

CD

मोरगाव, ता. ३१ : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगावचा माघी यात्रा उत्सव उद्या मंगळवार (ता. १) ते शनिवार (ता. ५) या काळात संपन्न होणार आहे. उत्सवानिमित्त दरवर्षी भाविकांना माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमीपर्यंत श्रींच्या मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींना जलस्नान घालण्याची पर्वणी असते. मात्र, कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांना मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेता येणार नाही. मात्र, गाभाऱ्याबाहेरुन नियमित दर्शन घेता येणार आहे.
याबाबत प्रशासनामार्फत आज वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी सूचना दिल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार व सरपंच नीलेश केदारी यांनी दिली.
मंदिराच्या चार दिशांना चार द्वार असून द्वार मंदिर ठिकाणी अनवाणी चालत जाऊन दूर्वा वाहण्याची प्रथा येथे प्रचलित आहे. तिथीचा क्षय आल्यामुळे बुधवारी (ता. २ पासून) ते शुक्रवार (ता. ४) पर्यंत केवळ तीन दिवस येथील द्वार यात्रा संपन्न होणार आहे. उत्सवानिमित्त गुरुवारी (ता. ३) मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा चिंचवड येथून मोरगाव येथे सायंकाळी ७ वाजता येणार आहे. सालाबादप्रमाणे चालत आलेले सर्व नियोजित धार्मिक विधी व कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविकांना बाहेरून नियमित दर्शनासाठी मंदिर सुरुच राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard enters house kitchen : बिबट्या थेट स्वयपाक घरात आला अन् पाहुणा झाला..., घायाळ बिबट्याला घरातून कसं काढलं बाहेर

MHADA: तरुणांसाठी आनंदाची बातमी! म्हाडामध्ये काम करण्याची संधी, भरघोस पगार मिळणार; कसा कराल अर्ज?

Video Viral : "विराटसारखी तू मॅच का जिंकून देत नाहीस?"; पत्रकाराने बाबर आझमची लाज काढली, मग संतापलेला फलंदाज म्हणाला...

Kim Jong Un: "नोकरी हवी असेल तर किम जोंग उनला जाड आणि कुरुर म्हण"... विचित्र अट ऐकून उमेदवार हादरला; Viral Video

महत्त्वाची बातमी! आता लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख अनिवार्य; २४ तास मॉनिटरिंग होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT