पुणे

मांडवगण फराटापर्यंत पीएमपीची बससेवा

CD

मांडवगण फराटा, ता. १८ : पुणे स्टेशन ते मांडवगण फराटा (ता. शिरूर) ही पीएमपीएमएल बससेवा रविवारपासून (ता. १७) सुरू करण्यात आली. आमदार अशोक पवार यांच्या हस्ते या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.
या परिसरासाठी बस सेवा चालू करावी, अशी या परिसरातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, कामगार व विद्यार्थी वर्गाकडून गेल्या सहा महिन्यांपासून मागणी केली जात होती. आमदार अशोक पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मांडवगण फराटा येथे बस डेपोचे व्यवस्थापक संजय कुसाळकर, सीनियर टाईमकिपर प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. पुणे स्टेशन येथून ही बस दुपारी १ व संध्याकाळी ७.४५ वाजता तर मांडवगण येथून सकाळी ६.३० व दुपारी ४ वाजता सुटणार आहे. याप्रसंगी बस चालक विनोद गायकवाड, वाहक नवनाथ तांदळे व पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने फेटे बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, संचालक दत्तात्रेय फराटे, माजी संचालक भानुदास फराटे, कांतिलाल होळकर, शंकर फराटे, लतिका जगताप, सरपंच शिवाजी कदम, उपसरपंच सुभाष पाटील फराटे, वाल्मीक नागवडे, माजी सरपंच माणिक फराटे यांची भाषणे झाली. यावेळी केशव फराटे, संभाजी फराटे, गणपत फराटे, सागर फराटे, जगन्नाथ जगताप, बाळासाहेब चौधरी, अंकुश शितोळे, दिलीप फराटे, प्रतिभा बोत्रे, मनीषा सोनवणे आदी उपस्थित होते. धनंजय फराटे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT