पाईट, ता. ८ : ‘‘गावाचा केवळ भौतिक विकासावर समाधान न मानता आर्थिक देखील विकासासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. राजकारण केवळ निवडणुकीपुरते असावे. विकास कामे करीत असताना त्यात कोणतेही राजकारण न आणता गावच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पक्षभेद-गटतट विसरून हातात हात घालून काम करण्याची गरज आहे,’’ असे मत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
कोये (ता. खेड) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे तीन कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय भेगडे, जालिंदर कामठे, गणेश भेगडे, प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, दत्ता काकडे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, नितीन मराडे, शांताराम भोसले, सहायक कार्यकारी अधिकारी शालिनी कडू, गटविकास अधिकारी अजय जोशी, सरपंच रामदास राळे, उपसरपंच सारिका राळे आदी उपस्थित होते.
यावेळी कपिल पाटील म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतीसाठी थेट येणारा वित्त आयोगाचा निधी सुमारे ८००० कोटींवरून १५व्या आयोगाद्वारे सुमारे २ लाख ३६ हजारांवर नेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरांवर विकास कामांचा स्तर उंचावत आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशातील सुमारे २ ते अडीच लाख ग्रामपंचायती केंद्रीय विभागला जोडलेल्या आहेत. या विभागातील कामात पारदर्शकता यावी, यासाठी पब्लिक फायनान्स मेंटेनन्स सिस्टीम पंतप्रधान यांनी सुरू केली आहे. ज्याद्वारे ग्रामपंचायती आता काम करताना दिसत आहेत.’’
यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी लिहिलेल्या ‘जिल्हा परिषद कामकाज- अनुभव, क्षमता आणि उणिवा’ या पुस्तकाचे प्रकाशन कपिल पाटील यांचे हस्ते करण्यात आले. शरद बुट्टे पाटील यांनी प्रास्ताविक; तर बाळासाहेब घाटे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच रामदास राळे यांनी आभार मानले.
शेती तज्ज्ञ असलेले या देशात मंत्री झाले, मात्र कारखान्याचा इन्कमटॅक्स कधी माफ झाला नाही. परंतु, साखर कारखाने जगले पाहिजेत, यासाठी अमित शहा यांनी कारखान्यांचा सुमारे ८००० कोटी रुपयांचा इन्कमटॅक्स माफ करण्याचे काम केले. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी इथेनॉल निर्मितीचा पंतप्रधानांचा निर्णय साखर कारखान्यांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
- कपिल पाटील, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री
०११८७
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथे मंगळवार ता. २८ रोजी झालेल्या मोढयांत या उपबाजारात २३,९९९ कांदा पिशव्यांची आवक होऊन मार्केट मध्ये जुना कांदा व नवीन कांद्यास वेगवेगळा बाजारभाव मिळाला असून यामध्ये एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस २८० ते ३०१ रूपये बाजार भाव मिळाला होता. तसेच दोन नंबर कांद्यास २०० ते २८० रूपये बाजारभाव मिळाला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस १२० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला. गोल्टा कांद्यास दहा किलोस ७० ते १२० रुपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस १० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला आहे. दरम्यान नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून बाजारभावात स्थिर आहे.(New onions have arrived in large quantities and market prices are stable)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.