पुणे

आळेफाटा बाजारामध्ये कांद्याच्या साडेतेवीस हजार गोण्यांची आवक

CD

आळेफाटा, ता. ४ : जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील
उपबाजारात रविवारी (ता. २) कांद्याची २३ हजार ५३१ गोण्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार एक नंबर कांद्यास प्रतिदहा किलोस २८१ रुपये बाजार भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुबरे यांनी दिली.
बाजारात नवीन कांद्यास प्रतवारीनुसार भाव मिळाला. एक नंबर कांद्यास प्रतिदहा किलोस २६०ते २८१ रूपये, दोन नंबर कांद्यास १८० ते २६०, तीन नंबर कांद्यास १२० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. गोल्टा कांद्याच्या प्रतिदहा किलोस ५० ते १०५ रुपये आणि बदला कांद्यास १० ते ५० रुपयांचा भाव मिळाला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. तेव्हा दहा किलोस ३११ रुपये बाजारभाव मिळाला होता. या तुलनेत रविवारी भावात वीस ते तीस रुपयांची घसरण झाल्याची माहिती व्यापारी संदीप कोरडे, जिवन शिंदे, संजय कुऱ्हाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT