राजुरी येथील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन आळेफाटा, ता. २२ : राजुरी (ता. जुन्नर) येथील आबाटेक वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन जिल्हा परीषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राजुरी ते आबाटेक हे अंतर तीन किलोमीटर आहे. यापैकी दोन किलोमीटरचे काम माजी आमदार शरद सोनवणे यांनी एक कोटीचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दिला होता व उर्वरित राहिलेल्या एक किलोमीटरचे काम करण्याचे राहीले होते. पवार यांच्या कडे हे काम पूर्ण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार पवार यांनी या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी दिला आहे. यावेळी उंचखडक गावच्या सरपंच सुवर्णा कणसे, उपसरपंच अजय कणसे, बाळासाहेब हाडवळे, दत्ता कणसे, सुरेखा कणसे, विजया कणसे, मनीषा कणसे, रामदास यादव, एकनाथ कणसे, सीताराम कणसे, सुनील कणसे, पंकज कणसे, राजेश कणसे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.