पुणे

बारामती महिलेचा पुर्ववैमनश्यातून खून

CD

माळेगाव, ता. १० : कऱ्हावागज (ता. बारामती) येथे रविवारी (ता. ९) पूर्ववैमनस्यातून महिलेचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. गंगूबाई तात्याराम मोरे (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत किरण दादा मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खून झालेल्या गंगूबाई यांची सून प्रमिला प्रमोद मोरे (वय ३०, रा. कऱ्हावागज) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, घराच्या अंगणात शेळ्या येण्याच्या कारणावरून अडीच वर्षांपूर्वी किरण दादा मोरे यांच्या कुटुंबीयांबरोबर भांडणे झाली होती. ती भांडणे गावपातळीवरील नेतेमंडळींनी व नातेवाइकांनी मिटविली होती. त्यामुळे त्यावेळी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तेव्हापासून आम्ही दोन्ही कुटुंबीय एकमेकांशी बोलत नव्हतो. असे असतानाही किरण मोरे हा आमची सासू गंगूबाई मोरे यांच्याकडे येताजाता रागाने बघत असत. रविवारी नेहमीप्रमाणे गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेऊन गप्पा मारण्यासाठी कांतिलाल मोरे यांच्या पत्राशेडजवळ गेल्या होत्या. त्याच वेळी किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे आला व त्याने आमच्या गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर त्याने त्यांच्या छातीवर जोरदार वार केला. त्यावेळीच तेथे जमलेल्या शारदाबाई पगारे, अधिकाबाई मोरे, माणिक सोनवणे यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो कुऱ्हाड व पायातील चप्पल जागीच सोडून माळरानाच्या दिशेने पळून गेला.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी किरण मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलिस निरिक्षक महेश विधाते हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal political violence: बंगालचं खुनी राजकारण! विरोधकांच्या मुलांचं रक्त आईला खायला लावलं होतं... सर्वात भयानक हत्याकांड...

ChatGPT अन् Google Gemini च्या नावाखाली मोठा Scam! युजर्सच्या अकाऊंटमधून आपोआप कट होत आहेत पैसे; नेमकं प्रकरण काय?

Mumbai: आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकात धूर, भुयारी मेट्राेचा खाेळंबा; दाेन तास प्रवाशांची गैरसोय

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 14 कोटी! सरकारने विकल्यापासून ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला तब्बल 1,400 पट रिटर्न

Parkinson’s Disease and Ayurveda: हात थरथरणे, हालचाली मंदावणे? पार्किन्सन्सवर आयुर्वेद ठरू शकतं का प्रभावी? जाणून घ्या संशोधन काय सांगतं

SCROLL FOR NEXT