पुणे

‘माळेगाव’च्या कार्यक्षेत्रात सव्वालाख टन ऊस उभा

CD

माळेगाव, ता. ५ : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन १६० दिवस उलटले आहेत. प्रतिदिनी साडेआठ ते साडे नऊ हजार टनाने ऊस गळीत उरकले आहे. मात्र, अद्याप कारखाना कार्यक्षेत्रात १ लाख २० हजार टन ऊस शिवारात उभा आहे.
माळेगाव कारखान्याने आजवर १३ लाख २८ हजार २१० टन उसाचे गाळप केले. त्यामध्ये सभासदांचा ७ लाख १६ हजार टन, तर गेटकेनधारकांचा ६ लाख ११ हजार टन ऊस आहे. त्यानुसार मिळालेल्या ११.१५ टक्के उताऱ्याचा विचार करता १४ लाख ७३ हजार ३०० साखर पोती निर्माण झाली आहेत. मात्र, कारखाना कार्यक्षेत्रात अद्याप १ लाख २० हजार टन ऊस शिल्ल्क आहे. सध्या उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने तोडणी मजुरांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रतिदिनी एक हजार टनाने गाळप खाली घसरले आहे. मात्र, शिवारातील शिल्लक उसाच्या क्षेत्राची तातडीने तोडणी व्हावी व वजनात घट येऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने शिल्लक उसाचे नियोजन करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

याबाबत शेतकरी राजेश जाधव, सुभाष शितोळे म्हणाले, ‘‘माळेगाव कारखान्याने यंदा ऊस गाळपाचे उद्दिष्ठ १५ लाख टनापर्यंत ठेवले होते. त्यानुसार प्रशासनाने साडेतेरा लाख टन गाळप उरकले आहे. अर्थात हा गाळपाचा विक्रम कारखान्याच्या इतिहासात अभिमानास्पद वाटतो. हे जरी खरे असले तरी सध्या कार्यक्षेत्रातील शिवारात अद्याप सव्वालाख टनापर्यंत उसाचे पीक उभे आहे. हे क्षेत्र उन्हाची तीव्रता वाढल्याने कसे जगवावे? असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. त्याचे गाळप लवकर उरकण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT