पुणे

बारामतीमधील अपघातात सहा ऊसतोड मजूर जखमी

CD

माळेगाव, ता. २४ः बारामतीनजिक नेपतवळ येथे रविवारी (ता. २४) एका मालवाहतूक टेंपोने माळेगाव साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर गाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये सहा ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींनी कारखाना प्रशासनाला या घटनेची माहिती मोबाईलद्वारे दिल्याने संबंधितांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

बारामती-मोरगाव रस्त्याने माळेगावचे ऊसतोड मजूर पहाटेच्यावेळी ट्रॅक्टर गाडीने बारामतीच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी बारामतीच्या दिशेने निघालेला भरधाव माल वाहतूक टेंपोच्या चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूस आदळला. यात ऊसतोड मजूर भाऊसाहेब शेवाळ, बाजीराव तुकाराम जाधव, हिराबाई एकनाथ शेवाळ, एकनाथ चव्हाण, उषाबाई बाजीराव जाधव, अंजू अशोक चव्हाण (सर्व रा. पुई, ता.नांदगाव, जि. नाशिक, हल्ली मुक्काम माळेगाव ) हे जखमी झाले. दरम्यान, पाहुणेवाडी येथे मागील पंधरा दिवसांपूर्वी अशाचपद्धतीने माळेगावच्या ऊसतोड बैलगाड्यांना पहाटेच्यावेळी माल ट्रकने उडविले होते. त्या अपघातात दोन बैलांचा मृत्यू झाला होता, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT