पुणे

''वाघिनी''ने परतविला बिबट्याचा हल्ला

CD

राहू, ता. २८ : रात्री दहाची वेळ... ६० फुटांवर दबा धरून बसलेली बिबट्याची मादी... तिच्याबरोबर दोन बछडे... अशा भीतीदायक वातावरणात सापडलेले दांपत्य... पत्नीने दाखविलेली समयसूचकता अन्‌ पण दैव बलवत्तर म्हणून वाचलेले प्राण... ही चित्रपटात शोभेल अशी घटना घडली आहे रविवारी (ता. २७) रात्री राहू (ता. दौंड) येथील संतोष दामू काळे यांच्या शेतात. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या पत्नी सीमा यांनी मोठ्या धैर्याने मादी बिबट्याच्या चेहऱ्यावर बॅटरीचा प्रकाश ठेवला व मोठमोठ्याने ओरडत हल्ला करू पाहण्याऱ्या बिबट्याला हुसकावून लावले.

बॅटरीच्या प्रकाशाने मादी बिबट्याने बिछड्यांसह शेजारच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचल्याची भावना काळे दांपत्याने व्यक्त करत देवाचे आभार मानले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (ता.२८) घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. भरदिवसाही मादी आणि बछड्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. राहू परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी मनोज शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे, पांडुरंग खोरकर, गौतम इनकर, आनंदा काळे, सीमा काळे, पांडुरंग टेंगले, बापू शिंदे, संजय खोरकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा, फाटके वाजवा. बॅटरीचा उजेड करा. बिबट्याचा पाठलाग करू नका, असे आवाहन वनविभागाचे अधिकारी विलास होले, शिवकुमार बोंबले यांनी घटनास्थळी पाहणी करताना ग्रामस्थांना केले.
दोन दिवसात बिबट्याच्या मादीसह बछड्यांना जेर बंद न केल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर अडवून गुलाबपुष्प देऊ.जर चुकून एखादी विघातक घटना घडल्यास त्यास वन विभागाचे स्थानिक ते वरिष्ठ अधिकारीच जबाबदार राहतील, असे ''सकाळशी बोलताना मनोज शिंदे व प्रशांत शिंदे या संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दौंड तालुका वन परिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील त्यांनी फोन न उचलून टाळाटाळ केली. पुणे जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम बांदल यांनी केली.

बिबट्याच्या मादीसह दोन बछडे आम्ही अवघ्या सुमारे ६० फुटांवर दिसले. आम्ही बॅटरीचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर मारल्याने तसेच आरडाओरडा केल्याने बिबट्याच्या मादीने बछड्यासह धूम ठोकली. या संकटातून वाचल्यामुळे मी आणि माझे पती संतोष यांचा अक्षरशः दुसरा जन्म झाला आहे.
- सीमा काळे

01411

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

SCROLL FOR NEXT