पुणे

पदाधिकाऱ्यांच्या चिकाटीमुळे गावचा विकास शक्य : संग्राम थोपटे

CD

भुकूम, ता. ३० : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चिकाटी धरून पाठपुरावा केल्यास गावाचा विकास निश्चित होतो. विविध योजना राबविणे शक्य होते असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भुकूम (ता. मुळशी) येथे सव्वाकोटी रुपये विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपसभापती भानुदास पानसरे, तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, संजय उभे, सुरेश निकाळजे, सुरेश पारखी, दिग्विजय हुलावळे, शिवाजी तांगडे, राहुल शेडगे, तुषार माझीरे, सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन हगवणे, सचिन आंग्रे, नीलेश ननावरे, सुवर्णा आंग्रे, गौरी भरतवंश, मयूरी अभिलाष आमले, सुवर्णा पानसरे, भागवत यादव उपस्थित होते.
थोपटे म्हणाले भुकूमसाठी सचिन आंग्रे व सचिन हगवणे यांनी विशेष पुढाकार घेतला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास सहकार्य करू. स्वबळावर झाल्यास प्रत्येक गट-गणात पक्षाचे कार्यकर्ते केलेल्या कामाच्या जोरावर पूर्ण ताकदीनिशी उतरतील असे सांगितले. पानसरे म्हणाले, आमदारांनी भुकूमसाठी मोठा निधी दिला त्यामुळे त्यांच्या पाठीशी कायम राहू. यावेळी थोपटे व पानसरे यांच्यात मार्मिक जुगलबंदी झाली. थोपटे म्हणाले पानसरे यांनी निधी मागितल्यावर निधी दिला. आगामी निवडणुकीत मतदानात आघाडी देऊन खरे आभार मानावे. पानसरे यांनी ज्वारी पेरल्यावर ज्वारीच उगवेल त्याची काळजी करू नका असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT