पुणे

मुरूममधील एकावर कोयत्याने हल्ला

CD

वडगाव निंबाळकर, ता. २५ ः नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमेश्वर कारखाना ते मुरूम रोडवर मुरूम विकासनगर येथे रविवारी (ता. २४) रात्री घडली.
वैभव दीपक खरात, हर्षद थोरात व सनी खुडे (रा. तळवणीनगर, मुरूम, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची तीन आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी मुरूम येथील युवराज नारायण सोनवणे यांनी फिर्याद दिली. या घटनेत आदित्य हा २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. आदित्य व आरोपींमध्ये यापूर्वी वाद झाला होता. एकमेकांच्या समजुतीतून तो मिटला होता. दरम्यानच्या काळात संबंधित मुलीचा विवाह झाला. परंतु आदित्य व ती फोनवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचा संशयावरून आदित्यला दुचाकीवरून गाठून त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT